Our Blogs

पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीवर उपाययोजना

root rot

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतात पाणी साचल्यामुळे पिकांमध्ये मर, मूळकुज, खोडसड आणि इतर जमिनीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे झाडांची मुळे आणि खोड कमकुवत होऊन ती मरतात. यासाठी शेतात साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा करणे आवश्यक आहे. कारण पाणी साचल्यामुळे मुळांना ऑक्सिजन मिळत नाही आणि ती सडतात. यामुळे अतिरिक्त पाणी शेतातून बाहेर काढता येईल आणि मुळांजवळ हवा खेळती राहील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जैविक आणि रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करणे फायदेशीर ठरते. ट्रायकोडर्मा व्हिरीडी आणि स्यूडोमोनास फ्लोरोसेन्स यांसारखी जैविक बुरशीनाशके जमिनीत मिसळल्यास रोगकारक बुरशीची वाढ थांबते. रोगाची लक्षणे दिसल्यास, कार्बेन्डाझिम किंवा मॅन्कोझेब सारख्या रासायनिक बुरशीनाशकाचे द्रावण तयार करून झाडांच्या मुळाभोवती आळवणी करावी.


नॅनो सिल्व्हर (Siller-100): जमिनीतील रोगांवर प्रभावी उपाय

तुम्ही नॅनो सिल्व्हर(siller-100) ची आळवणी देखील करू शकता. नॅनो सिल्व्हर हे अतिसूक्ष्म कणांच्या साहाय्याने थेट बुरशीच्या पेशीभित्तीवर हल्ला करून त्यांना छिद्र पाडते, तसेच DNA आणि प्रथिनांवर परिणाम करून बुरशी पूर्णपणे निष्क्रिय करते. त्यामुळे बुरशीची वाढ थांबते आणि ती नष्ट होते. हे अनेक ठिकाणी एकाच वेळी परिणाम करत असल्यामुळे बुरशीला प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची संधी मिळत नाही, तसेच कमी प्रमाणात वापरले तरी चांगला आणि दीर्घकाळ टिकणारा परिणाम मिळतो. याचा जमिनीवर रासायनिक अवशेष राहत नाही आणि माती व पिकांसाठीही हे सुरक्षित ठरते.

याउलट पारंपरिक बुरशीनाशकं बुरशीच्या जीवनचक्रातील फक्त एका टप्प्यावर, जसे की अंकुरण किंवा वाढ, इथे परिणाम करतात. त्यामुळे त्यांचा परिणाम मर्यादित राहतो आणि सतत वापरल्यास बुरशी लवकर प्रतिकारशक्ती निर्माण करते. शिवाय जास्त प्रमाणात वापरावे लागल्यामुळे जमिनीत रासायनिक अवशेष राहतात आणि उपयुक्त सूक्ष्मजीवांनाही हानी पोहोचू शकते. त्यामुळे जमिनीतून पसरणाऱ्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि दीर्घकालीन सुरक्षिततेच्या दृष्टीने नॅनो सिल्व्हर हा अधिक परिणामकारक आणि आधुनिक उपाय मानला जातो.

👉 तुम्ही पावसाळ्यात कोणते रोग अनुभवले आहेत? कमेंटमध्ये नक्की सांगा.
👉 हा लेख उपयुक्त वाटला तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *