देशभरात जून-जुलै महिन्यात झालेल्या ६% अतिरिक्त पावसामुळे खरीप पेरणीने जोर धरला आहे. १ ऑगस्टपर्यंत देशात ९३२.९३ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, हे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.१% जास्त आहे. यावर्षी धानाच्या लागवडीत १६.७% आणि मक्याच्या क्षेत्रात ११.७% वाढ झाली आहे. मात्र, तेलबिया आणि कापसाच्या क्षेत्रात किंचित घट झाली आहे. डाळींची पेरणी संमिश्र राहिली आहे. देशात पावसाचे असमान वितरण राहिले आहे; मध्य आणि वायव्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, तर पूर्व आणि दक्षिण भारतात कमी पाऊस झाला आहे. हवामान अनुकूल राहिल्यास पिकांचे उत्पादन स्थिर राहण्याचा अंदाज आहे.
८५% खरीप पेरणी पूर्ण

Agriculture Update India Farmer News Kharif Season 2025 Kharif Sowing Kharif sowing 2025 Maharashtra agriculture Monsoon 2025 कापूस लागवड कृषी विभाग अहवाल खरीप पेरणी खरीप हंगाम २०२५ तूर लागवड पाऊस पिकांची स्थिती पेरणीची आकडेवारी बाजरी पेरणी भात लागवड मका पेरणी महाराष्ट्र शेती मान्सून २०२५ शेतकरी शेतीविषयक बातम्या सोयाबीन पेरणी

Leave a Reply