Our Blogs

पावसामुळे वेलवर्गीय पिकांवर वाढलेल्या डावणी मिल्ड्यू आणि करपा रोगाच्या प्रादुर्भावावर प्रभावी उपाय 🌧️🌱

मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे 🌧️ राज्यातील वेलवर्गीय (काकडी, भोपळा, कारले, आणि कलिंगड) पिकांवर डावणी मिल्ड्यू आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या रोगाची सुरुवात पानांवर पिवळ्या रंगाचे अनियमित आकाराचे ठिपके दिसण्याने होते. विशेषतः पानांच्या खालच्या बाजूला जांभळ्या किंवा करड्या रंगाची बुरशीची वाढ स्पष्टपणे दिसते. रोग वाढल्यास पाने तपकिरी होऊन वाळतात आणि गळून पडतात 🍂, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया बाधित होते. करपा रोगामुळे पानांवर आणि फळांवर काळे किंवा तपकिरी रंगाचे डाग येतात. पानांवरील डाग गोलाकार असून ते मोठे होऊन एकमेकांत मिसळतात. फळांवर खोलगट आणि काळसर डाग तयार होतात, ज्यामुळे फळे सडतात आणि त्यांची गुणवत्ता पूर्णपणे घटते .

डावणी मिल्ड्यूसाठी रोगाची लक्षणे दिसताच मॅन्कोझेब, क्लोरोथॅलोनील, किंवा सायमोक्सॅनिल + मॅंकोझेब यांसारख्या बुरशीनाशकांची शिफारशीनुसार फवारणी करावी. तर करपा नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड, कार्बेन्डाझिम, किंवा थायोफिनेट मिथाइल यांचा वापर करू शकता. पण करपा आणि डावणी रोगाच्या एकत्रित नियंत्रणासाठी नॅनो कॉपर अधिक सिल्व्हर या संयुक्त डिसइन्फेक्टंटची फवारणी हि फायदेशीर ठरते.

पारंपारिक उपायांच्या तुलनेत नॅनो कॉपर आणि नॅनो सिल्वर सारखी नॅनो-आधारित उत्पादने अधिक प्रभावी आणि कार्यक्षम ठरत आहेत. ही नॅनो उत्पादने वापरल्यास पारंपरिक बुरशीनाशकांपेक्षा चांगला आणि जलद परिणाम मिळू शकतो . ते बुरशीच्या पेशींच्या आत सहजपणे प्रवेश करतात आणि त्यांची वाढ थांबवतात. नॅनो कणांचा पृष्ठभाग मोठा असल्यामुळे, नॅनो कणांमुळे औषध पानांवर चांगल्या प्रकारे पसरते आणि कमी प्रमाणात वापरले तरी प्रभावी ठरते. यामुळे औषधांचा वापर कमी होतो आणि शेतकऱ्यांचा खर्चही वाचतो . कमी रसायने वापरली जात असल्यामुळे पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी होतो. नॅनो-आधारित उत्पादने पर्यावरणासाठी अधिक सुरक्षित मानली जातात. नॅनो कॉपर आणि नॅनो सिल्वर दोन्ही बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांवर प्रभावी आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *