Our Blogs

Category: Uncategorized

  • कापूस उत्पादन

    कापूस उत्पादन

    कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (CAI) चालू पीक हंगाम २०२४-२५ साठी कापूस उत्पादनाच्या अंदाजात वाढ केली आहे. पूर्वीच्या ३०१.१५ लाख गाठींच्या अंदाजावरून आता देशात ३११.४० लाख गाठी कापसाचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही वाढ सुमारे १०.२५ लाख गाठींची आहे. उत्पादनातील ही वाढ प्रामुख्याने महाराष्ट्रात ५ लाख गाठी, तर गुजरात आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी १.५० लाख गाठींच्या वाढीव उत्पादनामुळे झाली आहे. या हंगामात कापसाची एकूण उपलब्धता (उत्पादन, आयात आणि शिल्लक साठा मिळून) ३८०.५९ लाख गाठी राहण्याचा अंदाज आहे. यापैकी देशांतर्गत वापर ३०८ लाख गाठी आणि निर्यात १७ लाख गाठी अपेक्षित आहे. जून अखेरपर्यंत बाजारात २९६.५७ लाख गाठीची आवक झाली असून, १ जुलै रोजी मिल्स, सीसीआय आणि व्यापाऱ्यांकडे एकूण १०८.०१ लाख गाठींचा शिल्लक साठा होता.

  • बोगस पीकविमा कारवाई

    बोगस पीकविमा कारवाई

    सरकारने नुकतेच २०२५-२६ मधील खरीप आणि रब्बी हंगामासाठी विमा योजनेचा शासन आदेश (जीआर) काढला. या जीआरमध्येच सरकारने बोगस विमा अर्जांवर कारवाई करण्याची तरतूद केली आहे. यापुढे बोगस पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकून शासनाच्या इतरही योजनांसाठी आधार ब्लॉक केले जाणार आहे. अशा शेतकऱ्यांना पीएम किसान, नमो किसान, लाडकी बहीण तसेच इतर अनुदानाच्या योजनांचाही लाभ मिळणार नाही. मागील वर्षी जवळपास ५ लाख ९० हजार बोगस विमा अर्ज आले होते. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.