कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२५ च्या हंगामासाठी भारताच्या खरीप पेरणीचे क्षेत्र ४% वाढीसह ९९५.६३ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. मुख्य खरीप पीक असलेल्या धानाच्या (भात) क्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली असून ३६४.८ लाख हेक्टर झाले आहे. कडधान्यांचे क्षेत्र सुमारे १०६.६८ लाख हेक्टरवर स्थिर आहे. भरडधान्यांचे क्षेत्र १७८.७३ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. तसेच तेलबियांचे क्षेत्र १७५.६१ लाख हेक्टरवर आले आहे, याचे मुख्य कारण सोयाबीन आणि भुईमूग यांच्या पेरणीतील घट आहे. कापसाचे क्षेत्र १०६.९६ लाख हेक्टर झाले आहे. ऊस ५७.३१ लाख हेक्टरवर आणि ताग ५.५४ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. भारतात खरीप पेरणी क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे, परंतु सप्टेंबरमधील हवामानाची स्थिती अंतिम उत्पादन निश्चित करण्यात आणि कापणीपूर्वी होणारे पिकांचे नुकसान टाळण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
Tag: खरीप हंगाम २०२५
-

देशपातळीवरील खरीप पेरणी
देशभरात चांगल्या पावसामुळे खरीप पिकांच्या पेरणीने वेग घेतला असून, एकूण लागवडीचे क्षेत्र ९३३ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. हे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ लाख हेक्टरने वाढले आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भाताचे लागवड क्षेत्र ३१९ लाख हेक्टर, उस ५७.३० लाख हेक्टरवर पोहोचले आहे. तर भरड धान्यांमध्ये, विशेषतः मक्याच्या लागवडीत १० लाख हेक्टरची वाढ होऊन ती ९२ लाख हेक्टर झाली आहे. कडधान्य पिकांचे क्षेत्र १०१.२० लाख हेक्टर, तेलबियांचे क्षेत्र १७१ लाख हेक्टर आणि कापसाचे क्षेत्र १०५.९० लाख हेक्टरवर पोहोचले आहे. सोयाबीन, भुईमूग आणि तूर यांसारख्या महत्त्वाच्या पिकांची पेरणी अजूनही पिछाडीवर आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पेरणी सुरू राहणार असल्याने एकूण लागवड क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
-

८५% खरीप पेरणी पूर्ण
देशभरात जून-जुलै महिन्यात झालेल्या ६% अतिरिक्त पावसामुळे खरीप पेरणीने जोर धरला आहे. १ ऑगस्टपर्यंत देशात ९३२.९३ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, हे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.१% जास्त आहे. यावर्षी धानाच्या लागवडीत १६.७% आणि मक्याच्या क्षेत्रात ११.७% वाढ झाली आहे. मात्र, तेलबिया आणि कापसाच्या क्षेत्रात किंचित घट झाली आहे. डाळींची पेरणी संमिश्र राहिली आहे. देशात पावसाचे असमान वितरण राहिले आहे; मध्य आणि वायव्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, तर पूर्व आणि दक्षिण भारतात कमी पाऊस झाला आहे. हवामान अनुकूल राहिल्यास पिकांचे उत्पादन स्थिर राहण्याचा अंदाज आहे.
-

शेतकऱ्यांचा कल मक्याकडे अधिक
चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मका लागवडीला विशेष पसंती दिल्याने सोयाबीन आणि कापसाच्या पेरणीखालील क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. सोयाबीन आणि कापसाला किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) कमी भाव मिळाल्याने शेतकरी मक्याकडे वळले आहेत, कारण मक्याला बाजारात चांगला दर मिळत आहे. 21 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात मक्याचे क्षेत्र जवळपास 10 लाख हेक्टरने वाढून 71.21 लाख हेक्टरवर पोहोचले आहे. याउलट, सोयाबीनचे क्षेत्र 7 लाख हेक्टरने घटून 111.67 लाख हेक्टरवर आले आहे, तर कापसाचे क्षेत्रही सुमारे 3.5 लाख हेक्टरने कमी होऊन 98.55 लाख हेक्टर झाले आहे.

