Our Blogs

Tag: SEA डेटा

  • एरंडेल तेल निर्यातीत घट

    एरंडेल तेल निर्यातीत घट

    चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी-जून २०२५) भारतातून ३.६५ लाख टन एरंडेल तेलाची निर्यात झाली आहे. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) च्या आकडेवारीनुसार, ही निर्यात मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कमी आहे. या वर्षी मार्च वगळता प्रत्येक महिन्यात निर्यातीत घट दिसून आली. मात्र, असे असले तरी वार्षिक निर्यातीचा कल वाढताच आहे. २०२४ मध्ये देशातून एकूण ६.४९ लाख टन एरंडेल तेलाची निर्यात झाली होती, जी त्या आधीच्या वर्षांपेक्षा जास्त होती. यावरून दिसून येते की, अल्पकालीन घसरण वगळता, जागतिक बाजारपेठेत भारतीय एरंडेल तेलाची मागणी वाढत आहे.

  • खाद्यतेल आयात

    खाद्यतेल आयात

    मे महिन्यापासून भारताच्या खाद्यतेल आयातीत वाढ होत असून, जुलै २०२५ मध्ये आयात १५.५० लाख टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. जी चालू हंगामातील  सर्वोच्च आयात आहे. या आयातीत ८.५० लाख टन पाम तेल, ४.९० लाख टन सोयाबीन तेल आणि १.९० लाख टन सूर्यफूल तेलाचा समावेश आहे. जून महिन्यात १५.३० लाख टन तेल आयात झाले होते. चालू हंगामात एकूण आयात (नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५) ९२ लाख टन झाली असली तरी, ती गेल्या वर्षीच्या १०१ लाख टनांपेक्षा कमी आहे. आयातीची अधिकृत आकडेवारी सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन (SEA) ऑगस्टच्या मध्यात जाहीर करेल.