Our Blogs

Tag: sustainable fashion

  • सेंद्रिय वस्त्र निर्यातीसाठी सरकारची GOTS प्रमाणीकरणाला मान्यता

    सेंद्रिय वस्त्र निर्यातीसाठी सरकारची GOTS प्रमाणीकरणाला मान्यता

    सेंद्रिय (ऑर्गेनिक) कपड्यांची निर्यात करणाऱ्यांसाठी परकीय व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) एक महत्त्वाचा धोरणात्मक बदल करत, सेंद्रिय कपड्यांना ‘नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गेनिक प्रोडक्शन’ (एनपीओपी) च्या नियमांमधून वगळले आहे. या निर्णयामुळे, आता निर्यातदारांना पूर्वीप्रमाणे सरकारी संस्थेकडून ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेट (टीसी) घेण्याची गरज राहणार नाही. ३१ जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, डीजीएफटीने ग्लोबल ऑर्गेनिक टेक्सटाइल स्टँडर्ड्स (GOTS) या खाजगी जागतिक मानक संस्थेद्वारे दिले जाणारे प्रमाणीकरण स्वीकारण्यास मान्यता दिली आहे.