| सेंद्रिय (ऑर्गेनिक) कपड्यांची निर्यात करणाऱ्यांसाठी परकीय व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) एक महत्त्वाचा धोरणात्मक बदल करत, सेंद्रिय कपड्यांना ‘नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गेनिक प्रोडक्शन’ (एनपीओपी) च्या नियमांमधून वगळले आहे. या निर्णयामुळे, आता निर्यातदारांना पूर्वीप्रमाणे सरकारी संस्थेकडून ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेट (टीसी) घेण्याची गरज राहणार नाही. ३१ जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, डीजीएफटीने ग्लोबल ऑर्गेनिक टेक्सटाइल स्टँडर्ड्स (GOTS) या खाजगी जागतिक मानक संस्थेद्वारे दिले जाणारे प्रमाणीकरण स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. |
Tag: Textile exports
-

सेंद्रिय वस्त्र निर्यातीसाठी सरकारची GOTS प्रमाणीकरणाला मान्यता
-

भारतीय निर्यात
अमेरिकेने १ ऑगस्टपासून भारताच्या सर्व निर्यातीवर २५% आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. याचा थेट फटका भारतीय कृषी निर्यातीला बसणार असून सर्वाधिक निर्यात होणारी कोळंबी आणि तांदळावर याचा परिणाम होऊ शकतो. या निर्णयामुळे अमेरिकेतील भारतीय मालाच्या किमती वाढतील, ज्यामुळे व्हिएतनाम, इक्वेडोर आणि पाकिस्तानसारख्या प्रतिस्पर्धी देशांना फायदा होण्याची शक्यता आहे. भारताने जीएम पिकांसारख्या मुद्द्यांवरून अमेरिकेच्या मागण्या फेटाळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या फार्मा आणि ऑटो क्षेत्राला यातून वगळण्यात आले असले तरी, भविष्यात त्यांच्यावरही आयात शुल्क लागू होऊ शकतो.
